Activity 2021-22
तणाव व्यवस्थापन कार्यशाळा

  April 27,2022

  

"तणाव ही एक ऊर्जा आहे "
मा. कालिदास पाटील
भिलवडी दि . २७ येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर अंतर्गत कला व वाणिज्य महाविद्यालय , कडेपूर अग्रणी महाविद्यालयार्तंगत "ताण तणाव व्यवस्थापन " या एकदिवशीय मानसशास्रीय कार्यशाळेचे आयोजन करणेत आले होते यावेळी प्रमुख पाहुणे मा. कालिदास पाटील - संस्थापक, सुश्रुषा सल्ला , मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्था , इस्लामपूर यांनी वरील उद्‌गार काढले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. जे .बी . चौगुले - विश्वस्त , भिलवडी शिक्षण संस्था , भिलवडी . कार्यशाळा समन्वयक डॉ . श्रीकांत चव्हाण . प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे आय क्यू एसी. समितीचे प्रमुख एस .एन. खोत , डॉ. एस.डी . कदम व्ही.एस. विनोदकर प्रा. ए . एन. केंगार डॉ. विजय गाडे हे उपस्थित 
होते .
     यावेळी प्रमुख पाहुणे मा . कालिदास पाटील म्हणाले की, सध्याच्या आधुनिक युगात जगत असताना हरघडी मनावर ताण - 
तणाव येत असतात त्यामुळे माणसाचे जीवन उध्वस्त होते. जंगलातील पक्षी , प्राणी मुक्तपणे जीवन जगतात मग आपण असे जीवन का जगू शकत नाही? त्याचे कारण आपण सातत्याने तणावाखाली असतो . तणाव ही एक ऊर्जा आहे. . तिचा योग्य पध्दतीने वापर केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात . तणाव ही आपली विचार प्रवृती , जीवन शैलीतून येतो . आणि तणाव ही प्रत्येकाची वैयक्तिक व व्यक्तगत बाब आहे . म्हणून तणावही व्यक्तिगत गोष्टीवर अवलबून असतो . आपण इतरांवर अवलंबून असू नयेच शिवाय आपल्या क्षमता आपणच ओळखून इतरांवर विश्वास ठेवावा की नको हे आपण शोधायचे आहे. आपण तारतम्याने विचार करायला शिकले पाहिजे . प्राप्त परिस्थितीला न डगमगता व नावे न ठेवता तिच्याशी झागडता आले पाहिजे . आपल्या जीवनात कशाला महत्व द्यायचे ते ठरविता आले . पाहिजे . आपले गुणदोष आपणच स्विकारावे तरच आपणास आनंद होऊन इतरांना आनंदी ठेवू शकतो . जी माणस मर्यादेच्या पलीकडे जाऊन विचार करतात ती मोठी होतात . समाज सेवा करतात नावलौकिक मिळवितात . आणि मर्यादित विचार करतात ती सतत तणावाखाली जीवन जगतात यातून मुक्तीचा एकच मार्ग म्हणजे ताण तणाव मुक्त जीवन जगणे होय . असे ते म्हणाले . यावेळी त्यांनी काही तणाव मुक्तीचे प्रयोगही केले.
    या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जे .बी . चौगुले सर - विश्वस्त भिलवडी शिक्षण संस्था भिलवडी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आमच्या काळातील मानसशास्र व आजच्या काळातील मानसशास्त्र यामध्ये बरेच परिवर्तन झाले आहे ते स्विकारार्ह आहे आणि चांगलेही आहे . त्याचा स्विकार करून तणाव मुक्त जीवन जगा असा मोलाचा सल्ला त्यानी दिला . 
      यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले . पाहुण्यांचा परिचय डॉ श्रीकांत चव्हाण यानी केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ . एम. आर . पाटील यांनी केले शेवटी आभार प्रा.डॉ.एस. डी . कदम यांनी मानले 
                 या कार्यक्रमास अग्रणी महाविद्यालयाशी संलग्न महाविदयालयातील विद्यार्थी व प्राध्यापक व चितळे महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थी नी प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .