Activity 2023-24
भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन

Bhilawadi  December 06,2023

  

चितळे महाविद्यालयामध्ये महापरिनिर्वाण दिन .
भिलवडी दि. ६ .डिसेंबर येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालया मध्ये भारतीय घटनेचे शिल्पकार , भारतरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी श्री. सचिन खंडेराव पाटील रा. भिलवडी यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे सर , शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर माजी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रणधीर शिंदे सर , शिवाजी विद्यापीठ ,इंग्रजी विभागाचे प्रा. डॉ. माने सर. प्रा. डॉ. कदम एस.डी. उपस्थित होते .
    या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री . सचिन पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ज्ञानाची शिखरे आणि सामाजिक जाणीवा लोकांच्या मनामनात रुजवून समाजाला समाजभान देणारे समाज सुधारक होते . त्यांनी ज्ञानाच्या जोरावर देशातच नव्हे तर परदेशातही आपल्या ज्ञानाचा प्रसार केला असे ते म्हणाले
 यावेळी मनोगत व्यक्त करतांना प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे सर म्हणाले की भारतीय संविधान हे जगातल्या अनेक संविधाना पेक्षा सरस आहे . आज जो गोंधळ चालू आहे त्याचे कारण कदाचित अशा लोकांना माहितच नसावे किंवा त्यांनी पूर्ण वाचन केले . नसावे . संविधान व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समजून घेणे सोपी गोष्ट नाही . आज देशातील कोणतीच गोष्ट संविधाना शिवाय घडूच शकत नाही . आज आपण इथे उभे आहोत तेसुद्धा संविधानामुळेच होय . याच संविधानावर अनेकांनी वेगवेगळे विचार मांडायला सुरुवात केली आहे त्यांनी संविधानाचा व त्यांच्या विचार व तत्वज्ञानाचा विचार करावा असे ते म्हणाले
     यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी , विद्यार्थी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदराजंली वाहिली यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. डी.पी. खराडे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. केंगार ए.एन. यांनी केले तर आभार प्रा. खोत एस. एन . यांनी मानले
या कार्यकमास संस्थेचे अध्यक्ष मा. विश्वास चितळे , उपाध्यक्ष - मा. डॉ. बाळासाहेब चोपडे संस्था सचिव , श्री. मानसिंग हाके यांचे सहकार्य लाभले