Activity 2023-24
भारतीय संविधान दिन व्याख्यान : 

Bhilawadi  November 25,2023

  

भारतीय संविधान दिन व्याख्यान : 
दि २५/११/२०२३ रोजी बाबासाहेब चितळे महाविद्यालयात भारतीय संविधान दिना निमित्त स्टाफ अकादमी , NSS  ,
आणि IQAC विभाग यांनी डॉ दीपक देशपांडे यांचे व्याख्यान आयोजित केले होते . डॉ  देशपांडे यांनी संविधानाचे महत्व  , डॉ आंबेडकरांनी शिक्षण हक्क जो मूलभूत हक्क आहे त्यावर आज NEP २०२० मुळे कसा आघात होऊन सर्वसामान्यांना शिक्षणा पासून वंचित ठेवणे , ग्रामीण भागातिल शिक्षण वेगवेगळ्या अटी शर्ती आणि बंधनात आणणे 
तसेच सध्या सुरु असलेल्या आरक्षण प्रश्नावर सखोल चर्चा केली . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ए एन केंगार यांनी अध्यक्षीय भाषणात नावे शैक्षणिक धोरण देशाचे मोठे नुकसान करणारे ठरेल आणि या सर्व गोष्टीचा त्रास होईल म्हणून संयुक्तिक धोरण शासनानी राबवावे
आणि आहे ती व्यवस्था 
व्यवसायाभीमुख  
शिक्षणानी अधिक मजबूत करावी हेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस खरे अभिवादन ठरेल असे सांगितले  .  कार्यक्रम आयोजनासाठी NSS  , IQAC  ,
इतिहास विभगानी
पुढाकार घेतला . 
डॉ  विनोदकर यांनी प्रस्ताविक केले तर आभार श्री आर एच भंडारे यांनी मानले .