Activity 2023-24
शारदीय व्याख्यानमाला

Bhilawadi  October 18,2023

  

स्री ही कुटुंबाचा आधार आहे . - सौ. उमा कोरे
भिलवडी दि. १८ येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील स्री समुपदेशन केंद्राच्यावतीने शारदीय नवरात्रोत्सवाचे दुसरे पुष्प गुंफतांना प्रमुख पाहुण्या सौ. उमा कोरे यांनी वरील उद्‌गार काढले यावेळी अध्यक्षस्थानी माळवाडी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच निलोफर तांबोळी ह्या होत्या यावेळी माळवाडी ग्रामपंचायत सदस्या सौ. अशिनी वायदंडे , स्री .समुपदेशन प्रमुखा प्रा. डॉ. सौ . एन.एस. गायकवाड , प्रा. सौ . बी.डी. पाटील मॅडम प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे सर उपस्थित होते .
       यावेळी प्रमुखा पाहुण्या सौ . उमा कोरे पुढे म्हणाल्या की , मुलगी जन्माला आली की लोक नाराज होतात.कारण मुलींच्या वर अत्याचार  अन्याय होतात.ते थांबविण्यासाठी तुम्ही शिक्षण घेऊन चांगल्या गोष्टचे अनुकरण करून आदर्श  कन्या  .,बहीण  ,आदर्श पत्नी  आदर्श गृहिणी. आदर्श माता  व आदर्श आजी..बनले  पाहिजे. आई वडिलांच्या  विश्वासाला. तडा जाऊ देता कामा नये  अंधकाराकडून प्रकाशाकडे नेणारी महिला असते. संघर्षाकडून विकासाकडे नेणारी स्रीच असते . पतीच्या  निधनानंतर स्री नेटाने घर उभी करते . स्री ही कुटुंबाचा आधार असते . परंतु आईचे निधन वडिलांच्या  आधी झाले  तर  ते  घर नेटाने उभा रहात 
नाही. ते कोसळते .म्हणून स्वबळावर घर उभे करण्याचे कार्य ती करते .
         यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. निलोफर तांबोळी यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना स्री ने केवळ स्वतःचेच नाही तर सर्व समाजाचे नेतृत्व करायला हवे. हे विश्वची माझे घर ही संकल्पना अमंलात आणली पाहिजे . समाजात असे अनेक कार्यक्रम आयोजित करून समाज प्रबोधन स्री जागृती करावी असे मत व्यक्त केले .
         यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. डॉ. सौ. एन.एस. गायकवाड यांनी केले तर आभार प्रा. सौ. बी.डी . पाटील यांनी केले यावेळी या कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनी , प्राध्यापिका , ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या . या कार्यक्रमास मा. अध्यक्ष , विश्वास चितळे , उपाध्यक्ष मा. डॉ. बाळासाहेब चोपडे , सचिव मानसिंग हाके यांचे मार्गदर्शन लाभले .