Activity 2022-23
विशेष श्रमसंस्कार शिबीर समारोप समारंभ

भिलवडी   February 28,2023

  

" श्रमाने विद्यार्थी घडतात " - प्राचार्य , डॉ. आर . एस साळुंखे ,
भिलवडी दि.२८ येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालय , भिलवडी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबीर दत्तक खेडे खंडोबाची वाडी येथे दि. २२ / २ / २०२३ ते २८ / २ / २० २ ३ या कालावधी मध्ये संपन्न झाले या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे मा. प्राचार्य ' डॉ. आर.एस. साळुंखे सर
 कला , विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय , पलूस . तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जयंत केळकर , संचालक , भिलवडी शिक्षण संस्था , भिलवडी संस्था सचिव मा. मानसिंग हाके , सहसचिव  मा. के . डी. पाटील , योग गुरु सुबोध वाळवेकर , प्रकल्प अधिकारी प्रा. डॉ. विनोदकर सर ' प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे सर , खंडोबाडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष मा. हणमंत शिदे , ग्रामपंचायत सदस्य मा. प्रताप शिंदे ' सौ गंगुबाई शिंदे ' ग्रामसेविका बाबर मॅडम ' मुख्याध्यापक पाटील सर , श्री . सागर कापसे उपस्थित होते
       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणाले की , राष्ट्रीय सेवा योजना विभाग हा सेवाभावी सेवा करणारा विभाग आहे . एक खेडे दत्तक घ्यायचे आणि त्या गावात विशेष श्रमसंस्कार शिबीर घेवून गावाचा कायापालट करायचा हा मुख्य हेतू समोर ठेवून विविध उपक्रम , श्रम करण्याचे काम करतात . या शिबीरामध्ये विविध प्रकारचे सर्व्हे केल्यामुळे त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडते . अनेक विद्यार्थी देशातर्गत कार्यक्रमामध्ये भाग घेवून नावलौकिक मिळवितात एवढेच नव्हे तर राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी कि ज्याने श्रमसंस्कार शिबीर पूर्ण केले तो कुठेही कमी पडत नाही . महापूर असो ' साथीचे रोग असो , कोरोनाचा काळ असो अथवा लसीकरण , पल्स पोलीओ , सव्हेक्षण अशा कार्यक्रमामध्ये हे स्वंयसेवक हिरीरीने भाग घेवून मदत करतात . मी माझ्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी सेवा करतो हे ध्येय नजरेसमोर ठेवून श्रमदान करत असतात हे विद्यार्थ्यांचे योगदान महत्वाचे आहे असे ते म्हणाले
        यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जयंत केळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजना ही श्रमाचे मुल्य शिकविणारी आणि संस्कार घडविणारी शैक्षणिक क्षेत्रातील फार मोठी शाखा असून स्वयंसेवक स्वंयस्फुर्तीने सहभागी होऊन कामे करतात आणि लोकांना श्रमाचे महत्व शिकवितात असे ते म्हणाले
यावेळी स्वंयसेवकांनी प्राथमिक शाळा सुशोभिकरण ' पेहिंग्ज ब्लॉक बसविणे , ग्रामस्वच्छता पाहणी पथकाचे स्वागत , पहाणी पथकासाठी डिजिटल सजावट , रांगोळी काढणे व स्वागतास उपस्थित होते . स्मशानभूमीची स्वच्छता , घरगुती गॅस वापर कसा करावा याबदल पलूस गॅस वितरण कंपनीचे कर्मचारी यांनी प्रात्यक्षिक सादर केले .विधवा स्रियांचा सर्व्हेही केला  , सर्जेराव खरात यांचे कथाकथन मा. सुबोध वाळवेकरांचे . योगा प्रशिक्षण , मराठी भाषा गौरव दिन असे विविध उपक्रम संपन्न झाले . यावेळी स्वंयसेवक व ग्रामस्थांची मनोगते झाली .
       यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य , डॉ. दीपक देशपांडे यांनी केले . पाहुण्यांचा परिचय प्रा. आर. एच . भंडारे यांनी करून दिला . सूत्रसंचालन डॉ. एन.एस. गायकवाड मॅडम व प्रा. केंगार ए. एन . यांनी केले तर आभार डॉ. एम. आर . पाटील यांनी मानले . शेवटी एन.एस एस. गीताने कार्यक्रमाची सांगता झाली