Activity 2022-23
" विशेष श्रमसंस्कार शिबीर "

भिलवडी   February 22,2023

  

"मदत करण्याची भावना एकसारखी असली पाहिजे " - न्यायमुर्ती जे.एस. माळी
भिलवडी दि. २२ येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे " विशेष श्रमसंस्कार शिबीर " दत्तक खेडे खंडोबाची वाडी ता पलूस जि. सांगली येथे बुधवार दि. २२ / २ / २० २३ ते मंगळवार दि. २८ / २ / २ ० २ ३ या कालावधी मध्ये संपन्न होत आहे . या कार्यक्रमाचे उद्‌घाटक माजी न्यायमुर्ती मा. जे.एस. माळी यांनी वरील उद्‌गार काढले यावेळी या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून भिलवडी शिक्षण संस्थेचे संचालक मा. डॉ. सुनिल वाळवेकर हे लाभले होते . खंडोबावाडीचे सरपंच मा. धनंजय गायकवाड , उपसरपंच मा ओमाणा जाधव ' ग्रामपंचायत सदस्या सौ. अश्विनी मदने सदस्य  प्रताप शिंदे ' मा. सर्जेराव शिंदे , जि.प. शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे , राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्पाधिकारी प्रा. डॉ. व्ही . एस. विनोदकर संस्थेचे उपाध्यक्ष मा. बाळासाहेब चोपडे व त्यांचा स्टाफ हे उपस्थित होते . 
       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणाले की, विद्यार्थ्यांवर केलेली गुंतवणुक ही अत्यंत महत्वाची आहे . हेच उद्याच्या भविष्याचे भाग्यविधाते आहेत . विद्यार्थ्यांनी देश घडविण्यासाठी भरपूर कष्ट केले पाहिजे . आणि समोर ध्येय ठेवले तरच कष्ट करायची आवड निर्माण होते. यासाठी भारतीय संविधान हा आपल्या समोरचा आदर्श असून सर्वांनी संविधानाचा मनःपूर्वक स्विकार करून अभ्यास केल्यास खडतर मार्ग सुद्धा सोपे होतात . सर्वांना समान संधी , जगण्याचा हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्य हे संविधानाने दिले आहे . याबरोबर कर्तव्येही दिली आहेत त्याचे पालन करावे .
       श्रमसंस्कार शिबीरे ही संस्कार शिकवितात आपण ज्या दत्तक खेड्यात आला आहात तर मनात कोणताच संकोच न बाळागता गावाची सेवा करा . वृक्षारोपण करा, प्रबोधन करा. कौटुंबिक समस्या , रोगराई ' आहार ' विहार ' स्री सक्षमीकरण ' बचत गट, रक्तदान . अवयव दान असे अनेक उपक्रम राबवून गावाची उन्नती करा . जगाचा पोशिंदा शेतकरी राजाला मदत व त्यांचे प्रबोधन करावे ' व्यसनमुक्ती ' डिजीटल साक्षरता ' याचेही ज्ञान द्यावे . या शिबीरामुळे नेतृत्व गुण जोपासत ' निःस्वार्थी सेवावृत्ती विकसित करा स्वतःची ओळख चांगला प्रकारे करावी . आणि गुन्हेगारी जगतापासून दूर राहावे असे ते म्हणाले
       यानंतर खंडोबावाडी गावचे मा. सरपंच श्री . धनंजय गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये ते म्हणाले की आमच्या गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वंयसेवक प्रबोधन करण्यासाठी  आहेत . त्या सर्वांचे मी स्वागत करतो आणि त्यांना शिबीर कालावधी मध्ये सर्वोतोपरी मदत करतो असे ते म्हणाले
        या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सुनिल वाळवेकर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य  " Not Me But You " हे लक्षात घेवून आपण या गावाची सेवा करावी . गावाची स्वच्छता करता करता गावातील लोकांच्या मनातील वाईट विचार , भावना काढून टाकण्यास प्रवृत्त करा गावचा विकास हा तरुणाईच्या पुढाकाराने चांगला होतो त्यासाठी तरुणाई ने पुढाकार घेवून गावाचा विकास करावा असे ते म्हणाले
       या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी केले . पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. विनोदकर व्ही . एस . विनोदकर यांनी करून दिला . सूत्रसंचालन प्रो. डॉ. सुरेश शिंदे यांनी केले तर आभार प्रो. सौ . गायकवाड एन एस यांनी मानले .