Activity 2022-23
भिलवडी शिक्षण संस्थेच्या विभागाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर ची निर्मिती 

भिलवडी   May 27,2023

  

भिलवडी शिक्षण संस्थेच्या विभागाच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर ची निर्मिती 

भिलवडी शिक्षण संस्थेच्या बाबासाहेब चितळे महाविद्यालयामध्ये संस्थेच्या सर्व विभागांना लागणारे आधुनिक सॉफ्टवेअर काल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विश्वास चितळे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हे अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असे सॉफ्टवेअर असून विद्यार्थ्यांची फी जमा झाल्यानंतर त्यांना देण्यात येणाऱ्या पावत्या, विद्यापीठासाठी लागणारे सर्व प्रकारचे फॉर्म, विभागीय सहसंचालक यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या माहिती व तक्ते जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक विभागांना लागणारे वेगवेगळे फॉर्म्स यामधून तयार होऊन मिळणार आहेत. त्यामुळे सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाज अतिशय सुलभ होणार आहे. हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी मेसर्स बीजी चितळे भिलवडी स्टेशन येथील श्री अतुल चितळे व त्यांचे सहकारी श्री मुजावर यांनी विशेष प्रयत्न घेतले. हे सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी संगणकाचे आणि सॉफ्टवेअरचे उत्तम ज्ञान असणारे भिलवडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि चितळे उद्योग समूहाचे संचालक माननीय श्री विश्वास चितळे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून सॉफ्टवेअर कार्यरत होण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी , तसेच नेटवरील सर्व खर्च स्वतः करून आणि स्वतः लक्ष घालून तयार करून घेतले आहे. हे सॉफ्टवेअर संस्थेला देणगी स्वरूपात मा अध्यक्ष आणि चितळे उद्योगसमूहामार्फत उपलब्ध करून दिले आहे.

त्याचे अनावरण करताना श्री विश्वास चितळे म्हणाले संस्थेला लागणाऱ्या सर्व गोष्टीं आम्ही आनंदानी पुरवू  मात्र या भागातील विद्यार्थ्यांचे कल्याण होईल यासाठी सर्व विभागांनी प्रयत्नरत राहिले पाहिजे .
या प्रसंगी संस्था उपाध्यक्ष डॉ बाळासाहेब चोपडे, सचिव श्री मा शि हाके , सहसचिव आणि विभाग प्रमुख श्री के डी पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दीपक देशपांडे , सर्व शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते . या सॉफ्टवेअर निर्मितीत श्री अतुल सर , श्री मुजावर आणि अध्यक्ष यांच्याशी सतत संपर्क ठेवून सौ एस आर कुलकर्णी मॅडम यांनी महाविद्यालयाच्या सर्व मागण्या त्या सॉफ्टवेअर मध्ये पुर्ण करून घेतल्या .