Activity 2022-23
राष्ट्रीय सेवा योजना दिन

भिलवडी   September 24,2022

  

श्रमाने विद्यार्थी घडविण्याचे काम राष्ट्रीय सेवा योजना करते -डॉ. -प्रभाकर माने
भिलवडी दि. २६ येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालय , भिलवडी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना संपन्न झाला. या दिनाचे प्रमुख पाहुणे मा. प्रभाकर माने यांनी वरील उद्‌गार काढले . यावेळी अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे , राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक प्रा. भंडारे आर एच . प्रा.डॉ.एस.डी. कदम सर उपस्थित होते .
        यावेळी प्रमुख पाहुणे म्हणाले की, हा स्थापना दिन केवळ साजरा करण्यासाठी नसतो तर . या योजनेमध्ये योगदान देवून कायम लक्षात ठेवणासाठी असतो . ज्या देशाची शिक्षण व्यवस्था कमकुवत असते तो देश रसातळास जात असतो . उत्साह आणि जोश मनात असेल तरच देशाचा विकास होत असतो . म्हणून तरुणांनी या योजनेत सहभागी होऊन देश बलवान केला पाहिजे . जागतिक क्रमवारीत भारत हा १२८ क्रमांकावर आहे . आणि जगातिल छोटे छोटे देश भारताच्या पुढे आहे कारण त्यांचे दरडोई उत्पन्न १लाख ३२ हजार कोटी आहे म्हणून असे देश जागतिक क्रमवारीत भारतापुढे आहेत. आजची तरुणाची अस्वस्थ , बेरोजगारी, शिक्षण , आरोग्य  या पैकी तरुणांना स्वास्थ देणारी कोणतीही गोष्ट या देशात होत नाही . देश सक्षम करण्यासाठी युवकांचे योगदान महत्वाचे आहे . ज्या समाजाला आपण काम करतो त्या समाजाला समजून घेणे , स्वतःला , संबंधित समाजाला समजावून घेण्यासाठी पात्र बनविणे . समाजाच्या गरजांची माहिती करून घेणे , त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या दूर करणे . अशा माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वंयसेवकांनी देशासाठी , समाजासाठी योगदान दिले पाहिजे . असे ते म्हणाले
          यावेळी या कार्यकमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे म्हणाले की , राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वंयसेवक हा सेवाभावी वृत्तीने राबतो . समाजाची सेवा करत असतो . भिलवडीमध्ये आलेल्या महापुरामध्ये स्वयसेवकांनी गावाची स्वच्छता करणासाठी आहोरात्र कष्ट घेतले . कोवीड काळ असो , पल्स पोलीओ , व्यसनमुक्ती अभियान , मतदान जनजागृती अभियान , स्वच्छ भारत अभियान . बेटी वाचवा अभियान , साक्षरता अभियान अशा वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये आमच्या महाविद्यालयातील स्वंयसेवकांनी केवळ सहभागच घेतला नाही तर स्वतःला झोकून देवून काम केले आहे असे ते म्हणाले .
          यावेळी या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा.डॉ. व्ही.एस. विनोदकर यांनी केले . प्रमुख पाहुयांचा परिचय प्रा. आर. एच . भंडारे यांनी करून दिला . यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाने दि. २४ / ९ / २०२२ रोजी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचे प्रमाणपत्र प्रदान कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आभार प्रा.डॉ. सौ . एन . एस. गायकवाड यांनी मानले . या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी , स्वंयसेवक , प्राध्यापक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .