Activity 2022-23
क्रांतीविराना अभिवादन

भिलवडी   August 09,2022

  

"चितळे महाविद्यालयामध्ये क्रांतीवीरांना अभिवादन "
भिलवडी दि. ११ येथील बाबासाहेब चितळे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व प्राध्यापक प्रबोधिनीच्यावतीने आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातर्गत  मा. प्राचार्य डॉ. दीपक देशपांडे यांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीवीरांचे योगदान या विषयावर व्याख्यान दिले यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. केंगार ए एन. हे होते . राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. व्ही एस. विनोदकर ' तसेच प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख प्रा व्ही एस . यादव , डॉ. एस.डी. कदम उपस्थित होते .
      यावेळी प्रमुख पाहुणे प्राचार्य दीपक देशपांडे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी आपल्या प्राणांचे बलीदान दिले एवढेच नाही तर त्यांनी आपल्या घरांवर तुळशीपत्र ठेवले होते . इंग्रजांनी देशाला जरी स्वातंत्र्य दिल असले तरी देशाची शकले करूनच दिले आहे . स्वातंत्र्याच्या क्रांतीवीरामध्ये जहाल व मवाळवादी गट होते . जहालवाद्यांच्या हातातील मशाल काढून अहिंसेचे अस्र देण्याचे कार्य महात्मा गांधी होते . महात्मा गांधींनी अहिंसा मार्गानी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे . असे ते म्हणाले
           यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. ए.एन. केंगार यांनी स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतीवीरांचे योगदान हे अत्यंत महत्वाचे आहे . त्यामुळेच देशाला स्वातंत्र्य मिळाले असे ते म्हणाले
           या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. व्ही.एस. यादव यांनी केले . सूत्रसंचालन प्रा. खोत एस.एन यांनी केले तर आभार प्रा. कणसे सरानी मानले