Kshitij Magazine

आमच्या महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षी क्षितिज' वार्षिक अंक प्रकाशित केला जातो. महाविद्यालयाचा वार्षिक अंक म्हणजे महाविद्यालयाचा आरसा असतो. कारण महाविद्यालयाने वर्षभरात राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम, कार्यक्रम, विविध स्पर्धा, वर्षभरातील महत्वपूर्ण घडामोडी यांचे प्रतिबिंब त्यात पहावयास मिळते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या भावभावनांचा अविष्कार देखील त्यामध्ये सामावलेला असतो. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या प्रतिभेतून आलेले अनमोल क्षण जपण्याचं व्यासपीठ म्हणजे 'क्षितिज' वार्षिक अंक आणि त्यामुळेच क्षितिज वार्षिक अंकाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ. पी. बी. कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयाचा पहिला अंक सन 2001 2002 या वर्षी प्रकाशित झाला. प्राचार्य डॉ. पी. बी. कुलकर्णी व पहिले संपादक डॉ. एस बी शिंदे यांनी या अंकाचे 'क्षितिज' असे नामकरण केले. आजअखेर क्षितिज वार्षिक अंकाचे एकूण 18 अंक प्रकाशित झालेले आहेत. तसेच या अंकाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ. पी.बी. कुलकर्णी, प्रभारी प्राचार्य डॉ. एस. बी. चव्हाण व प्राचार्य डॉ. डी. जी. देशपांडे यांनी काम पाहिलेले आहे. या अंकाचे मुख्य संपादक म्हणून डॉ. एस. बी. शिंदे, डॉ. व्हि. एम. गाडे, प्रा. एस. एस. पाटील, डॉ. एस. डी. कदम व प्रा. ए. एन. केंगार यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे.

क्षितिज वार्षिक अंकाच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असतो. विद्यार्थ्यांच्या लेखन क्षमतेचा विकास करून त्यांना नवनिर्मितीचा आनंद देण्याचा प्रयत्न करीत असतो. या अंकामध्ये विद्यार्थी लिखित लेख, कथा, कविता, चारोळ्या, विनोदी चुटके यांचा अंतर्भाव असतो. आमच्या महाविद्यालयातील नवोदित लेखकांतून प्रसिद्ध कवयित्री सौ. लता ऐवळे-कदम, प्रसिद्ध हास्य कलाकार श्री शरद जाधव व कथाकथनकार व लेखक श्री महादेव माने यासारखे साहित्यिक निर्माण झालेले आहेत. हे या उपक्रमाचे यश आहे.

या अंकासाठी भिलवडी शिक्षण संस्थेचे मा. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त व सर्व संचालक मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभते. तसेच महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद, प्रशासकीय सेवक वर्ग, आजी-माजी विद्यार्थी या सर्वांच्या प्रयत्नातून हा अंक पूर्णत्वास जात असतो.